Solapur News : पेरणी चार लाख हेक्टरवर पण विमा अडीच लाख हेक्टरवरच

शेतकऱ्यांनी फिरविली विम्याकडे पाठ
Ratnagiri News
पेरणी File Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : गेल्यावर्षी अतिवृष्टी होऊनही पीक विम्याचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरविली आहे. पीक विम्यासाठी ३ लाख ३२ हजार ६७० अर्ज प्राप्त झाले असून ३ लाख ९२ हजार ५४६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पेरणी क्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ६२ टक्के असून, या पिकांसाठी एकूण ६६.४० कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक ९४ हजार ४८७ अर्ज प्राप्त झाले असून, ४०.४६ कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. तूर पिकासाठी ७८ हजार ४१६ अर्ज तर एकूण विमा हप्ता २.५२ कोटी रुपये आहे. मका पिकासाठी ५२ हजार ५१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पिकासाठी ०.३३ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. उडीद पिकासाठी ३२ हजार ४५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ४० हजार २६७ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २० हजार ४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून, १.०८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

मूग पिकासाठी ७ हजार ५३५ अर्ज प्राप्त झाले असून, ५ हजार ३४३ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या पिकाचे विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ७१ टक्के असून, विमा हप्ता ०.५१ कोटी रुपये आहे. भुईमूग पिकासाठी १ हजार ८३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पिकासाठी ०.२२ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

बाजरी पिकासाठी ३८ हजार ६७८ अर्ज प्राप्त झाले असून, ०.३१ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे. कांदा पिकासाठी २६ हजार ७४७ अर्ज प्राप्त झाले असून, ३२ हजार ८७९ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १३ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. विमा संरक्षित क्षेत्राचे प्रमाण ४३ टक्के असून, या पिकासाठी २०.९८ कोटी रुपयांचा विमा हप्ता नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news