Solapur News | टोमॅटो गळाले; आंबे, पेरू, केळीचेही नुकसान

करमाळा तालुक्यात ओला दुष्काळसद़ृश परिस्थिती
Solapur News |
करमाळा : तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आ. नारायण पाटील व ग्रामस्थ.Pudhari Photo
Published on
Updated on

करमाळा : करमाळा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही मंडळांत मोठा पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने शेतामध्ये चिखल झाला आहे. पिकांची मुळे सडू लागली आहेत. भुईमुगाच्या शेंगांना कर आले तर टोमॅटो गळून पडले. आंब्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पेरू व डाळिंबाच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. डाळिंबाच्या कळ्या गळून पडल्या आहेत.

तालुक्यात मंगळवारपर्यंत झालेल्या पावसाची नोंद तब्बल 258.3 मिलिमीटर आहे. म्हणजेच एक हजार 16 टक्के पाऊस तालुक्यात नोंदला. अर्जुननगर 174.4, केम 294.3, जेऊर 340.3, सालसे 297.7 कोर्टी 249.8 उमरड 340.3, केतुर 200.6 असा या आठ मंडळामध्ये पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस जेऊर व उमरड मंडलात नोंदला. याभागात तब्बल 340.3 झाला. सालसेत 297.7 तर केममध्ये 294.3 पाऊस झाला.

तालुक्यातील पश्चिम भागात उमरड, वाशिंबे, पारेवाडी, केतुर याबरोबरच चिकलठाण, कुगाव, शेटफळ, दहिगाव, वांगी परिसरामध्ये डाळिंब, केळी, ऊस, टमाटे, मिरची, ढोबळी मिरची आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर भागांमध्ये मांगी, वडगाव, पूनवर, खडकी, आलजापूर, पाडळी, घारगाव, संगोबा आदी ठिकाणी कांदा, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले. कृषी सहाय्यक संपावर असले तरी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी अनेक ठिकाणी नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करून काही ठिकाणी पंचनामेही सुरू केले आहेत.

गेल्या बारा दिवसांपासून करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे कांदा, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. माझा एकट्याचे चार एकरातील 400 गोण्या कांदा भिजला. त्यामुळे जवळपास एक लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. सुमारे 30 टन उत्पन्न निघण्याची शक्यता होती. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
- अजय बागल, मांगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news