Solapur Crime: पावणेचार लाखांचे दागिने लंपास

सोलापुरातील महिलेची बारामती येथील इसमासोबत मेट्रोमनी ॲपवर ओळख
Solapur Crime: पावणेचार लाखांचे दागिने लंपास
(File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील महिलेची बारामती येथील एका इसमासोबत मेट्रोमनी ॲपवर ओळख झाली. त्‍यानंतर सोलापुरात भेट झाल्यानंतर त्‍या इसमाने महिलेचे पावणेचार लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना मार्च महिन्‍यात घडली याबाबत १३ ऑगस्‍ट रोजी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

राधिका उदय किनकी (वय ३७, रा. वसुंधरा अपार्टमेंट, सोलापूर) हिची एका मेट्रोमनी ॲपवरुन सिध्दार्थ देविदास झेंडेपाटील (रा. म्‍हसोबाची वाडी, बारामती, पुणे) याच्‍याशी ओळख झाली. या ओळखीतून ते २८ मार्च २०२६ रोजी सोलापुरात भेटले.

व्‍हीआयपी रोडवरील गोल्‍ड दुकानातून येथून सोन्‍याची चैन व सोन्‍याचे कानातले असा एकूण तीन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज सिध्दार्थ हा घेऊन गेला. याप्रकरणी राधिका कनकी हिच्‍या फिर्यादीवरुन सिध्दार्थवर सदर बझार पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news