Solapur Crime: बार्शीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा

बार्शीत निर्भया पथकाची धडक कारवाई : तिघे ताब्यात; एक लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Solapur Crime: बार्शीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा
pudhari photo
Published on
Updated on

बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीतील लातूर रोड, तेलगिरणी चौकातील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानात कल्याण-मुंबई मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच निर्भया पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकलसह एक लाख ७६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस कर्मचारी नम्रता गटकुळ यांनी शहरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग सुरू केले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून पोहेकॉ बाबासाहेब घाडगे यांना फोनवर माहिती मिळाली की, लातूर रोडवरील रमाकांत पिसे यांच्या सायकल दुकानात काही इसम येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडून पैसे घेऊन कल्याण व मुंबई मटका खेळवत आहेत.

या माहितीच्या आधारे निर्भया पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. सायकल दुकानात तपासणी केली असता गणेश सोमनाथ पिसे (वय ३३, रा. सुभाषनगर) सुदेश पांडुरंग खुळपे (वय ३६, रा. सुभाषनगर) आणि शाम सोमनाथ काशीद (वय ३०, रा. गोकुळ किल्ला) हे तिघे नागरिकांकडून पैसे घेत चिठ्ठ्यांच्या पुस्तकावर आकडेमोड करताना आढळले.

पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रक्कम, एक मोटारसायकल, दोन मोबाईल, कॅलक्‍युलेटर, बालपेन, आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या, चिठ्ठी पुस्तके वीस आणि मटक्याचे अंक छापलेले पेपर जप्त करण्यात आले. अमोल सोमनाथ पिसे यांच्या सांगण्यावरून हा जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नम्रता गटकुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीनही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news