Solapur Crime: कुख्यात आरोपी जेरबंद

शहर गुन्हे शाखेची कारवाई, आंतरराज्य घरफोडीचे 35 गुन्हे नोंद
Solapur Crime: कुख्यात आरोपी जेरबंद
Published on
Updated on

सोलापूर : 35 घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य कुख्यात आरोपीस शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफतीने अटक केली. जुळे सोलापुरात दोन दिवसांपूर्वी घर फोडून त्याने दहा लाखांचे दागिने लंपास केले होते. त्याच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

जुळे सोलापुरातील रेवती तमशेट्टी यांचे घर फोडून नऊ लाख 57 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले होते. या घरफोडीच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे पथक तपास करीत असताना त्यांना माहिती मिळाली की मार्केट पोलिस चौकी समोरील रस्त्यावर एक कार संशयीतरित्या थांबली आहे.

यावेळी पथकाने सदर ठिकाणी जाऊन गाडीस घेराव घालून गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इसमास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर (वय 48,रा. सत्यनारायण कॉलनी रोड, नागारम केसर मंडल, जि. मल्काजगिरी, तेलंगणा) असल्याचे सांगितले. कारची तपासणी केली असता डॅश बोर्डच्या ड्रॉव्हरमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळली. सदर दागिने आणि रक्कम जुळे सोलापुरातील घरफोडीतील असल्याचे सांगितले.

त्याच्याकडून घरफोडीतील 8.2 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच कार असा आठ लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त गौहर हसन, डॉ. आश्विनी पाटील, सहा. पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश गायकवाड, नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, सतिश काटे, बाळासाहेब काळे व पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news