Solapur Crime : धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली

सदर बझार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा
Extortion
खंडणी
Published on: 
Updated on: 

सोलापूर : मामांची बदनामी करणारी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची धमकी देत तसेच मावस भावाविरुद्धची तक्रार मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार महावीर चौकात घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत मेलगेपाटील (रा. लिमयेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश मनलोर (वय ३५) आणि राजबक्ष गुंडापुरे (दोघेही रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ७ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी श्रीकांत हे महावीर चौकात मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी संशयीत आरोपींनी फिर्यादीला फोन करून त्यांचे मामा दिलीप माने यांच्याबाबत खोटी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच मावसभाऊ निखिल भोसले याच्याविरुद्ध झालेली तक्रार मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.