Solapur Crime : बाळाची हत्या, मुलीवरही हल्ला करून आईचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

बार्शी तालुक्यातील पांगरी येथील घटना
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

बार्शी : तालुक्यातील पांगरी येथे एका विवाहित महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या मुलाची ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली, तर सहा वर्षांच्या मुलीवरही धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत तिला गंभीर जखमी करून त्या महिलेनेही घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 28) रोजी घडली.

आशा नीलेश जाधव (वय 28) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तिचे सासरे कल्याण किसन जाधव (वय 66, रा. पांगरी) यांनी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शेती व्यवसाय करतात तर त्यांचा मोठा मुलगा नीलेश जाधव हा सध्या धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा ठाण्यात पोलिस कर्मचारी आहेत.

शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते त्यांची पत्नी सुचिता हे ममदापूर येथील शेतात कांदा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी त्यांची सून आशा नीलेश जाधव ही तिची सहा वर्षांची मुलगी अद्विका आणि सहा महिन्यांच्या मुलासह होती. घटनेची माहिती मिळताच जाधव पती पत्नी यांनी तत्काळ पांगरी येथील घरी व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे त्यांची नात अद्विका ही गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आढळली. तिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने खोल जखमा दिसून आल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news