Solapur Crime | अल्पवयीन मुलीचे लग्न, अल्पवयातच प्रसूती : माहेर- सासरच्या लोकांवर गुन्हा!

Child Marriage
Child Marriage Pudhari
Published on
Updated on

टेंभुर्णी : - अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले.तसेच ती अल्पवयीन असताना तिला मुल झाल्याचा प्रकार माढा येथे उघडकीस आला आहे. यामुळे दोन्ही कडील नातेवाईक,पती अशा सहा व इतर जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियमअतंर्गुगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मौजे आढेगाव (ता.माढा) येथे घडली आहे.या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि ३१ जुलै २०२४ रोजी दु.१३.३० ते दि.०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, शिवाजी दादासाहेब शिंदे, रणजित शिवाजी शिंदे, सुनीता शिवाजी शिंदे सर्व रा.आढेगाव (ता. माढा) तसेच दत्तू जालिंदर माने, राणी दत्तू माने दोघे (रा.इंदापूर) या सासर व माहेरचे नातेवाईक यांनी मुलगी अल्पवयीन असताना लग्न लावले. यातून संबधित मुलगी गर्भवती राहिली. ती अल्पवयीन असताना प्रसूत झाली. प्रसूती वेळी देखील नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये खोटी कागदपत्रे दाखल करून शासनाची ही फसवणूक व दिशाभूल केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

आढेगाव येथील ग्राम पंचायत अधिकारी समीर शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.ग्रामीण भागात अद्याप ही अल्पवयीन मुलींचे छुप्या पद्धतीने परस्पर संमतीने सर्रास विवाह लावून देण्यात येतात. शासकीय यंत्रणे पर्यंत माहिती जात नाही. यामुळे अनेक अल्पवयीन निर्भयाचे आयुष्य वाया जात आहे. यामुळे शासनाच्या वतीने कडक कार्यवाही व्हायला हवी. या घटनेचा अधिक तपास पोनि बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत मदने हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news