Solapur Crime | पोखरापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने काढला पत्नीचा काटा : सत्तूरने केले वार

परभणी जिल्ह्यातील दांपत्य :मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावातील घटना
Solapur Crime
Solapur Crime
Published on
Updated on

पोखरापूर : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना दि. १ आक्टोंबर रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या पूर्वी मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावच्या हद्दीत घडली.पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मोहोळळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नजिक पिंपरी येथील बालाजी बापूराव वाघमोडे यांच्या शेतात गट नं ३७२ / १ मध्ये मकवान कापण्यासाठी परभणी जिल्ह्यातील टोळी आली होती. या टोळीतील दर्शन सुर्यभान वाणी रा. कातनेश्वर ता. पुर्णा, जि.परभणी व त्याची पत्नी सुनिता दर्शन वाणी हे पती पत्नी ही आले होते.

या टोळीतील मुकादम करण उर्फ शंकर गायकवाड याचे वडील संजय गायकवाड याचे सुनिताशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय घेवून सुनिता वाणी वय २८ वर्ष हिच्या गळ्यावर तिचा पती दर्शन वाणी याने कोयत्याने सपासप वार केले. यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यातच तीचा जागीच मृत्यू झाला.सुनिता वाणी हिच्या खून प्रकरणी तिचा पती दर्शन वाणी यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत ज्यांच्या शेतात ते आले होते, ते शेतमालक बालाजी बापूराव वाघमोडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news