Solapur crime: सराईत गुन्हेगार गायकवाड स्थानबध्द

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी
Solapur crime: सराईत गुन्हेगार गायकवाड स्थानबध्द
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील विविध भागात जबरी चोरी व गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रदीप मौला गायकवाड (वय 33, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) या सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली. त्याची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

प्रदीप गायकवाड याच्या विरोधात सदर बझार, सलगर वस्ती, विजापूर नाका व फौजदार चावडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, मारामारी यांसारखे एकूण 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी 2012 ते 2024 दरम्यान त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. मात्र, त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यामुळे शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई केली.

पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत 56 जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त राजन माने, दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, नामदेव बंडगर, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम घाडगे, एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news