

सोलापूर : शहरात संघटित गुन्हे करणार्या चार जणांच्या टोळीला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी ही कारवाई केली.
सराईत गुन्हेगार गणेश नागनाथ भोसले (वय28, रा. प्रियदर्शनीनगर, विडी घरकूल) ईश्वर ऊर्फ रौनी भोलेनाथ चौगुले (वय 25, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली) नारायण ऊर्फ बबलू नागनाथ भोसले (वय 32, रा. प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकूल) आणि सद्दाम शबीर शेख (वय 27, रा. भारतनगर, जुने विडी घरकूल) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
यांच्याविरुद्ध सन 2019 ते 2025 या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांना सादर झाला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे यांनी कारवाई केली. चौघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले. तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडले.