Solapur Crime News : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले; दोन महिलांना 45 लाखांना फसवले

सोलापुरातील दोन महिलांची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल
Sangli Fraud News
सांगलीच्या व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूकfile photo
Published on
Updated on

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट होत असून त्याकरिता बँक अंकाऊटची गरज आहे. ज्यांचे बँक खाते वापरले जाईल, त्यांना 2 टक्के कमीशन मिळते, असे सांगत सोलापूर शहरातील एका महिलेचे 26 लाख 52 हजार व दुसर्‍या महिलेचे 18 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

येथील अश्विनी तुकाराम भोसले, (वय-36, सम्राट चौक, माने वस्ती) व त्यांची मैत्रीण पद्मीनी या दोघींना शेअरमार्केटमधील प्रॉफिटचे आमिष दाखवून फसवण्यात आले. याबाबतची तक्रार अश्विनी भोसले यांनी दिली. तक्रारीवरून दीपाली सुहास चाबुकस्वार, सुहास विठ्ठल चाबुकस्वार दोघे रा-121 उत्तर कसबा , अभिषेक शंकर निराळे, वय-25, रा. हांडे प्लॉट जुना नाका यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही घटना 10 मार्च ते 13 ऑगस्ट या काळात घडली. फिर्यादी भोसले व त्यांची मैत्रीण पदमीनी यांना एक महिन्याकरिता तुमच्या नावाने बँक खाते काढून द्या. त्या बदल्यात तुम्हाला हजार रुपये खात्यावर मिळतील. ते पैसे तुम्हीच घ्या. तुमचे खाते एका महिन्यात क्लोज करून देतो. तुम्हाला काही अडचण येणार नाही असे सांगून आरोपींनी या महिलांचा विश्वास संपादन केला होता.

फिर्यादी अश्विनी भोसले यांच्याकडून मोबाईलचे नवीन सिमकार्ड व कर्नाटक बँकेचे खातेही काढले. त्याद्वारे इतर राज्यातील लोकांचीही फसवणूक केली. त्यापैकी फिर्यादी भोसले यांच्या बँकेच्या खात्यातून एकूण 26 लाख 52 हजार रुपये व त्यांची मैत्रीण पदमिनी यांच्या बँक खात्यातून 18 लाख 30 हजार रुपयांचीे फसवणूक केली. ही रक्कम वेगवेगळया खात्यावर ट्रान्सफर केली. यासाठी भोसले यांच्या बँक खात्याचा वापर करून आर्थिक फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news