

सोलापूर ः जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी परिस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या. पहिल्या घटनेत आठजणांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने काठीने, हातापायानी मारहाण केली, डोक्यात कोयत्याने वार करून एकाला जखमी केले. मारहाणीची ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भगतसिंग चौकात घडली.
याबाबत जावेद अब्दुलरौफ शेख (वय 26, रा. शास्त्री नगर) याने तक्रार दिली. तक्रारीवरून खलिल काल्या कुरेशी, फ रहान सादिक कुरेशी, रिहान सादिक कुरेशी, मुद्दस्सर कुरेशी, अस्लम मुजावर, तालीब सय्यद कुरेशी, जिहान कुरेशी, व इतर (सर्व रा. शास्त्री नगर) यांच्या गुन्हा दखल करण्यात आला आहे. भांडणाच्या रागातून चौघांकडून लोखंडी रॉडने मारहाण भांडणाचा राग मनात धरून चौघाजणांनी मिळून एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सादिक बशीर कुरेशी वय 45, रा. न्यू तिऱ्हे गाव, फॉरेस्ट , सोलापूर यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.
तक्रारीत म्हटले की, सादिक कुरेशी यांचा मुलगा खालिद कुरेशी व त्याचा मित्र अरबाज मुल्ला हे दोघेजण इराबत्ती चौकात बसले असताना तिऱ्हे गाव येथील चौघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादी सादिक कुरेशी हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारीवरून बुलंद कुरेशी, आलीम कुरेशी, सोनू कुरेशी, जावेद शेख (सर्व रा. शास्त्री नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.