

सोलापूर : ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने बार्शीतील मोहसिन साबीर तांबोळी व त्याच्या टोळीतील सदस्यांच्या विरोधात येथील पोलीस निरीक्षक हद्दपार करण्याविषयीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला होता. त्यानुसार ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला एक वर्षाकरिता हद्दपारीची कारवाई केली आहे.
हद्दपारीच्या कारवाईत टोळीतील टोळी प्रमुख मोहसिन साबीर तांबोळी यांच्यासह शहाबाज जहाँगीर शेख, इब्राहिम राजअहमद शेख, अखिल इब्राहिम सय्यद असे सर्वजणचे बार्शी शहरातील आहेत. टोळी प्रमुख व टोळीतील सदस्यांना सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात दहशत माजवुन खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, महिलांची छेडछाड करणे, जातीवाचक शिवीगाळी करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे यासह अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे टोळीतील सदस्यांवर टोळीने संघटीतरित्या एकत्र येवून तर कधी टोळीचा सदस्य म्हणुन स्वतंत्ररित्या गुन्हे करून सामाजिक स्वास्थ बिघडवले होते.
सर्वजण दहशतही निर्माण करत होते. इब्राहिम जहाँगीर शेख यांना यापुर्वी हद्दपार करण्यात केले होते. तसेच इतराविरूध्द प्रतिबंध कारवाई करून देखील त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी प्रकरणांची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे समक्ष झाली. व, टोळीला एका वर्षासाठी हद्दपार केले.
हद्दपार केलेल्या क्षेत्रात चारही जण वावरत असल्याचे आढळला तर त्याची माहिती संबधीत पोलीस ठाणे व ग्रामीणच्या नियंत्रण कक्ष येथे कळवावे. तसेच भविष्यात देखील दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या विरुध्दही अभिलेख तयार करण्यात आले असुन त्यांचे विरूध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार आहे.
ही कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी केले असुन अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व अन्य पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कामकाज यांनी कामकान केला आहे.