

सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी जाहीर झाली. 2017 मध्ये महापालिकेच्या सर्वात्रिक निवडणुकीमध्ये जी प्रभाग रचना होती त्यामध्ये कोणताही बदल न करता जैसे थे प्रारूप प्रभाग रचना ठेवण्यात आली आहे. एकूण 26 प्रभाग असून 102 नगरसेवक संख्या आहे. बुधवार पासून महापालिकेच्या कॉन्सिल हॉल येथे प्रभाग रचना नकाशे पाहाण्यासाठी ठेवले आहेत. 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत सूचना हरकती घेण्यासाठी मुुदत आहे. दरम्यान, प्रभाग रचना पाहण्यासाठी भावी कारभार्यांची महापालिकेत लगबग वाढली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील उपरोक्त प्रभाग रचना तयार करताना कोणतेही प्रगणक गट फोडण्यात आलेले नाहीत. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा जास्त या मर्यादेतच ठेवण्यात आली आहे. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, नाले, रस्ते, रेल्वे रूळ, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 मधील चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना होती. सदर प्रभाग रचनेमध्ये कोणताही बदल न करता सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये चार सदस्यीय 24 प्रभाग व तीन सदस्यीय 2 प्रभाग (प्रभाग क्र. 25 व 26) तयार करण्यात आले आहेत. हरकती व सूचना डॉ. व्दारकानाथ कोटणीस हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी निवडणूक कार्यालयात स्किारण्यात येणार आहे. दरम्यान कौन्सिक हॉल येथे लावण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग यादी पाहण्यासाठी भावी नगरसेवक मोठ्या प्रमाणत गर्दी करत आहेत.
सर्व प्रभागाचा एकत्रित नकाशा साटी सात हजार रुपये भरून सर्व 26 प्रभागाचे नकाशे घेता येणार आहेत. एक प्रभागाचा नकाशा पाहिजे असल्यास सातशे रुपये शासन अधिसूचना पाहिजे असल्यास प्रति पान तीन रुपये फी आकारण्यात येणार आहे. सर्व नकाशे अभिलेखापाल कार्यालयात अर्ज केल्यानंतर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.