Solapur Electric Shock Accident : विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

विद्युत शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळले
Solapur Electric Shock Accident : विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू
pudhari photo
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : पंढरपूर शहरातील जुना कराड नाका येथे घराचे काम सुरु होते. दुसऱ्या मजल्यावर सेंट्रींगचे काम करणाऱ्या मजुराला घराच्या वरुन गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तो खाली कोसळला. यात तो जागीच मृत्यू पावला आहे. ही घटना शुक्रवार दि.30 रोजी सकाळी घडली आहे. मृत्यू पवलेल्या इसमाचे नाव संभाजी शिवाजी कांबळे (वय 38) रा. गादेगाव (ता.पंढरपूर) असे आहे.

जूना कराड नाका येथे घराचे बांधकाम सुरु होते. दुसऱ्या मजल्यावरील काम सुरु होते. या घरावरुन विद्युत वांहक तारा गेलेल्या आहेत. घराच्या छताच्या वरुन केवळ तीन फुट उंचावर तारा आहेत. सेंट्रींगचे काम करत असताना या विद्युत तारांना कटवणीचा स्पर्श झाला. तसा विद्युत शॉक बसल्याने मजूर संभाजी कांबळे हे दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळले आणि जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर तातडीने संभाजी कांबळे यास उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, कामाचा ठेकेदार, घरमालक आणि वीज वितरण कंपनी यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे संभाजी कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत ठेकेदार, घरमालक व वीज वितरण कंपनी यांच्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह नेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगीतल्याने उपजिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.