सोलापूर : भाजपच्या राजकीय फायद्यासाठी मतदार याद्यांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून देशपातळीवर मतचोरी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, त्यांना अटक करून त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसने सोमवारी (दि.२८) जिल्हा परिषदेच्या समोरील पूनम गेट येथे आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला प्रतीकात्मक बेड्या ठोकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी खा. प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर आरिफ शेख, कार्याध्यक्ष मनोजदादा यलगुलवार, शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सरचिटणीस ॲड. केशव इंगळे, श्रीशैल रणधिरे, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, उदयशंकर चाकोते, सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते.