

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी जिल्हासंपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी बोलावलेल्या बैठकीत नाराजी नाट्य पाहावयास मिळाले. महापालिकेच्या निवडणूकीत यश मिळवायचे असेल तर जिल्हाप्रमुखांची बदला असा सूर काही पदाधिकार्यांनी बैठकीत लावून धरला तर अनेक पदाधिकार्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने बंद खोलित बैठक घेण्याची नामुुष्की संपर्कप्रमुखांवर आली.
आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर रविवार दि. 25 मे रोजी शासकीय विश्रामगृहात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक झाली. शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुुख अनिल कोकीळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निष्ठांवत शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महापालिका निवडणूकीत यश मिळवायचे असेल तर प्रथम शहर उत्तर विधानसभा आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख बदला, बाहेरून आलेले लोक निष्ठांवत शिवसैनिकांना न्याय देत नाहीत, आपला वेगळा गट निर्माण करून जुुन्या शिवसैनिकावर पक्ष संघटनेत अन्याय केला जात असल्याच्या तक्रारी केल्याचे समजते.
पदाधिकार्यांची बाजू जाणून घेऊन कोकीळ यांनी आगामी महापालिका निवडणूकी बूथ यंत्रणा सक्षम करणे, मतदार यादीची जबाबदारी, प्राथमिक सदस्य, क्रियाशिल सदस्य नोंदणी अभियान यावर चर्चा केली. शहराचा पाणी प्रश्न गंभिर आहे. समांतर जलवाहीनी काम झाले आहे. तरी देखिल शहवासीयांच्या नशबी विस्कळीत पाणी पुरवठा राहणार आहे. हा पाणी प्रश्न घेऊन जनतेच्या दारबारात जा, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या मानात घर करा, मगच शिवेसेना पक्षाला महापालिकेची निवडणुक सोपी जाणार असल्याचा कानमंत्र शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसैनिकांना दिला.
या बैठकीत जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, दत्तात्रय गणेशकर, दत्तोपंत वानकर, रेवण बुक्कानवरे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, दत्ता माने, नाना मोरे, सुरेश जगताप यांच्यासह महिला आघाडी, युवती सेना, कामगार सेना, ग्राहक संरक्षक कक्ष, वाहतुक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या जेम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यामध्ये 24 उपशहर प्रमुख तर 23 उपजिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. मात्र बैठकीस 4 उपशहर प्रमुुख तर 3 उपजिल्हाप्रमुुख उपस्थित होते. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुुखांनी देखिल या बैठकीस दांडी मारली, उपनेते बैठकीकडे फिरकले नाहीत त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचे दिसून येते.