Solapur traffic changes: शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल होणार

शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, ट्रॅफिक जाम, बेशिस्त पार्किंग यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची तयारी शहर पोलिस दलाने सुरू केली
Solapur traffic changes
Solapur traffic changesPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील वाहतुकीची वाढती समस्या, ट्रॅफिक जाम, बेशिस्त पार्किंग यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची तयारी शहर पोलिस दलाने सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत शहरातील विविध ठिकाणी पाहणी करुन वाहतुकीचा आढावा घेतला.

शहरातील वाहतुकीची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेशिस्त पार्किंग, नो एन्ट्रीत वाहनांची ये-जा, दुचाकींची वाढलेली संख्या यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. यामुळे आता वाहतुकीची समस्या कायम सुधारायची असेल तर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तेच ओळखून शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहर वाहतुकीत मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते.

त्यानुसार पोलिस उपायुक्त गौहर हसन यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणांना भेट देऊन वाहतुकीची माहिती घेतली. प्रत्येक भागात वाहतुकीची वेगवेगळी समस्या आहे. त्यानुसार तेथे कोणते बदल करता येतील, त्याचबरोबर पार्किंग, नो एन्ट्री याबाबत काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत चर्चा केली. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, व. पोलिस निरीक्षक महादेव राऊत, रवींद्र भंडारे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news