Solapur News : सोलापूर शहर-जिल्ह्यातील १८ धर्मादाय रुग्णालयात ३५० खाटा राखीव

आर्थिक कमकुवत कुटुंबातील रुग्णाला आधार
Solapur News : सोलापूर शहर-जिल्ह्यातील १८ धर्मादाय रुग्णालयात ३५० खाटा राखीव
Published on
Updated on

सोलापूर : शहर व जिल्ह्यात १८ धर्मादाय रुग्णालये आहेत. या रूग्णालयांमध्ये गोरगरीब, गरजू व अत्यल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी ३५० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

या आरक्षित खाटांचा प्रभावी वापर व्हावा. शासकीय योजनांचा फायदा रुग्णांना व्हावा यासाठीच त्या उपलब्ध केल्या आहेत. गरीब, गरजू रुग्णांना या रुग्णलयांना उपचार नाकारता येणार नाही. यामुळे अशा धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटांमुळे आर्थिक कमकुवत कुटुंबातील रुग्णाला आधार ठरत आहे.

धर्मादाय रुग्णालयांना मान्यता देतांनाच गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे बंधन घालूनच ती दिली जाते. या रूग्णलयांना रुग्णांना उपचार नाकारता येत नाही. उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा वापर हा समाजातील गरीब व गरजूंसाठी करावी लागते. धर्मादाय रुग्णालयाकडून जर रुग्णाला उपचार नाकारल्यास तक्रारही रूग्ण व नातेवाईकांना करण्याची सुविधाही शासनाकडून करण्यात आला आहे.

धर्मादाय रुग्णालये : १८

शासकीय योजनांसाठी राखीव खाटा : ३५०

लाभार्थी : गोरगरीब व गरजू रुग्ण

रुग्णालयांची जबाबदारी : पात्र रुग्णांना उपचार देणे, शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे. जागेचा वापर वैद्यकीय सेवेसाठीच करण्याचे निर्देश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news