Solapur children’s hospital: बाल रूग्णालयात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

विविध पदांवरील रिक्तअसलेल्या जागा भरण्याची गरज
Hospital Staff
Hospital Staff Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : येथील महिला व नवजात शिशू (बाल) रुग्णालयात गत वर्षी 28 हजार 122 महिलांंनी बाह्यरुग्ण विभागात विविध आजारांवरील उपचाराचा लाभ घेतला. रुग्णालयात विविध पदांवरील कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची गरज आहे.

गुरूनानक चौकातील महिला व नवजात शिशू (बाल) रुग्णालय हे शंभर खाटांचे आहे. या आरोग्य संस्थेत उच्च रक्तदाब, मधुमेह, पोटाचे विकार यासह किरकोळ व अन्य गंभीर स्वरूपाच्या आजारावरही उपचार केले जातात. सध्या येथे उपलब्ध असलेले तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यावर सर्वच प्रकारचे उपचार केले जातात. मात्र, येथे नियमित कर्मचारी यांची संख्या कमी आहे. नियमित जागांवर नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्त झाल्यास येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार मिळू शकणार आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

या रुग्णालयात विविध पदांवरील 18 हून अधिक जागा रिक्त आहेत. यात नवजात शिशु विभागातील कुशल आरोग्य सेविकांच्याही काही जागांचा समावेश आहेत. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिला रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळण्यासाठी व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्त जागा भरणे गरजेचे आहे.

महिला व बालरुग्णालयातील रिक्त जागांच्या बाबतीत सविस्तर माहिती घेऊन त्याविषयी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे याविषयी पाठपुरावा करणार आहे. शिवाय, जिल्हातील अन्य आरोग्य संस्थेतील अडचणीबाबतही पाठपुरावा करू.
- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर
या रुग्णालयात उपलब्ध डॉक्टर आणि अन्य विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर चांगल्या प्रकारे वैद्यकीय उपचार केले जातात. रिक्त जागांविषयी वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आले आहे.
- डॉ. जयश्री डोळ्ळे, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बालरुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news