

करमाळा : तालुक्यातील उजनी जलाशयाच्या फुगवट्यावरील प्रस्तावित एआय डेटा सेंटरसह प्रस्तावित चार प्रकल्पाला कडाडून विरोध करताना चिकलठाण येथील ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी मोठा एल्गार पुकारला. यात महिला पदाधिकाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदविला.
चिकलठाण येथील महिला सरपंच धनश्री गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली चिकलठाण येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये ग्रामसभा झाली. उजनीवरील प्रस्तावित सर्व प्रकल्प रद्द करण्याचा ग्रामसभेत एकमुखी ठराव करण्यात आला आहे. सरपंच धनश्री विकास गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी उजनीवरील प्रकल्पांमुळे पाणी, शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.
उजनी जलाशय हा परिसरातील शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जलाशयाशी संबंधित कोणतेही प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच राबवावेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. अखेर उजनी जलाशयावरील ये आय बाहेर डेटा सेंटरसह सर्व प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) नवनाथ केकान, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अमोल गायकवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.