सोलापूर : मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा
 Solapur Crime News
मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.file photo
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जाऊन त्यांच्या अंगावर धावून ‘तु काय काम करतोस, जरा नीट वाग, वाचायला येतय का तुला’ असे मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत ओरडू, शिवीगाळ करीत हात उगारून दमदाटी केल्याप्रकरणी मोहोळ येथील सुदर्शन कळसे याच्यावर गुन्हा दाखल झाला.

मंगळवार दि. 21 रोजी दुपारी 3 च्या सुमारास मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके हे माहिती अधिकार अर्जावरील अपिल सुनावणीचे कामकाज करत होतो. त्यावेळी सुदर्शन दत्तात्रय कळसे (रा. कळसेनगर, मोहोळ) हा कार्यालयाच्या दरवाजावर जोरात धक्का देऊन आतमध्ये आला. मुख्याधिकारी डोके यांच्या अंगावर धावून अर्वाच्या भाषेत ओरडून शिवीगाळ केली. हात उगारून दमदाटी केल्याची फिर्याद मुख्याधिकारी डॉ. डोके यांनी दिली असून त्यानुसार सुदर्शन कळसे याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news