Solapur Politics : सभापती निवडीत माढ्याचे वर्चस्व; मोहिते-पाटलांना शह

पालकमंत्री गोरे यांच्याकडून मिळाले निरोप; इच्छुकांनी दाखल केले अर्ज, सर्व निवडी बिनविरोध
Solapur Politics : सभापती निवडीत माढ्याचे वर्चस्व; मोहिते-पाटलांना शह
Published on
Updated on
संगमेश जेऊरे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वर्चस्व दिसून आले असून, मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी संस्कृती सातपुते, चेतनसिंह केदार, अमृता वाघे यांना संधी दिली. हे तीनही सभापती माढा लोकसभा मतदारसंघातील आहेत.

सभापती पदासाठी नावे निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीत बैठक बोलवली होती. दरम्यान, या बैठकीला माजी आ. राजेंद्र राऊत, राजन पाटील, यशवंत माने, आ. सचिन कल्याणशेट्टी, प्रणव परिचारक, माजी आ. राम सातपुते यांची उपस्थिती होती. जयकुमार गोरे यांनी होटगी रोडवरील एका हॉटेलमधून निरोप पाठविल्यानंतर समाज कल्याण सभापती पदासाठी माळशिरसच्या संस्कृती राम सातपुते यांनी सकाळी अर्ज दाखल केला. त्यानंतर होटगी गटाचे रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापतीसाठी माढ्याच्या अमृता वाघे आणि शेवटी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी अर्ज दाखल केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, गटनेत्या रश्मी बागल, प्रवक्ते नेताजी खंडागळे यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news