

सोलापूर : आयुष्मान भारत कार्ड निर्मितीत सोलापूर जिल्हा राज्यात सर्वात खालच्या क्रमांकास होता. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना माहिती होताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या टिमला तंबी देऊन कामाला लावले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत सोलापूर जिल्हा आयुष्मान भारत कार्ड निर्मितीत राज्यात प्रथम आहे.
तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आयुष्मान भारत कार्ड निर्मितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोलापूर जिल्हा राज्यात खालच्या स्तरावर गेला होता. मात्र, नूतन सीईओ कुशन यांनी नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांना आयुष्मान भारत कार्ड निर्मितीस गती देण्याचे आदेश दिले.
त्यानंतर डॉ. कोपूरवाड यांनी आरोग्य विभागाच्या टिमसोबत कार्ड निर्मितीच्या कामाला गती दिली. त्यामुळे सोलापूर जिल्हा कार्ड निर्मितीत राज्यात सलग आठ दिवस अव्वल ठरला आहे.
आठ दिवसांत काढले बारा हजार कार्ड
जिल्हा आरोग्य विभागाकडून गेल्या आठ दिवसांत 12 हजार 167 आयुष्मान भारत कार्डची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यमित्र आणि आशा सेविकांचा वाटा मोठा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.