

सोलापूर : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेराचे वॉच राहणार असून, मतदारांना मतदानासाठी जांभळ्या रंगाचा स्केचपेन दिला जाणार आहे. त्यानुसार मतदारांना पसंतीक्रम द्यावे लागणार आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
मतदान प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर, तहसीलदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.