Solapur Accident| कार-दुचाकी अपघातात अरण येथील एकाचा मृत्यू

मोडनिंब गावाजवळ सोलंकरवाडी फाटा येथील घटना
Solapur Accident News
कार-दुचाकी अपघातात अरण येथील एकाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

मोडनिंब : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात अर्जुन तुकाराम वाघमारे (वय ५७, रा. अरण, ता. माढा) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मोडनिंब गावाजवळ सोलंकरवाडी फाटा येथे शुक्रवारी सकाळी झाला.

सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने (एमएच १४ एफएक्स २४५८) मोडनिंब येथून अरण येथे जात असलेल्या दुचाकीला (एमएच १३ बीके ८२०६) समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत अर्जुन वाघमारे यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक व मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अर्जुन वाघमारे यांचा मृतदेह वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. अक्षय लोखंडे आणि चालक नागनाथ भालेराव यांनी मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.