Ujani Dam Fishing: उजनी जलाशयातील मच्छीमारी ठेका रद्द करा

केत्तूरमध्ये स्थानिक मच्छीमारांचे उपोषण
Ujani Dam Fishing: उजनी जलाशयातील मच्छीमारी ठेका रद्द करा
Published on
Updated on

करमाळा : उजनी जलाशयातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका प्रणाली कायमस्वरूपी रद्द करून स्थानिक मच्छीमार व संबंधित घटकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी लोकशासन आंदोलन प्रणित उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने मच्छीमार बांधवांनी एकदिवसीय उपोषण केले.

सरपंच सचिन विठ्ठल वेळेकर व ग्रामपंचायत अधिकारी गणेश पवळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उजनी जलाशयावर मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांसह धरणग्रस्त, पारधी समाज, आडतदार, हॉटेल चालक, मासे विक्रेते, जाळी विक्रेते, बोट मालक व चालक आदी अनेक घटकांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे.

मच्छीमारीचा ठेका दिल्यास या सर्व घटकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.स्थानिक नागरिकांच्या रोजगार व उदरनिर्वाहाचा विचार करून मच्छीमारी ठेका पद्धती रद्द करावी, स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करावे आणि संबंधित घटकांच्या रोजगाराची हमी द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी दिपाली डिरे, पूनम डिरे, पूजा कणीचे, पूजा पत्तुले, आशा पत्तुले, अंजना कणीचे, वनिता कणीचे, मंगल नगरे, केसरबाई नगरे, मंगल डिरे, पदमेश नगरे, दत्तात्रेय कणीचे, अमोल चंबरे, हनुमंत नगरे, रमेश पत्तुले, किरण कणीचे, अजिनाथ कणीचे, सतीश मुंगसे, संतोष कणीचे, गणेश पत्तुले, दादा नगरे आदी मच्छीमार बांधव व नागरिक उपस्थित होते.

उजनी जलाशयावर मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांसह धरणग्रस्त, पारधी समाज, आडतदार, हॉटेल चालक,मालक, मासे विक्रेते, जाळी विक्रेते, बोट मालक व चालक आदी अनेक घटकांचा रोजगार या मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून आहे. मच्छीमारी ठेक्याने दिल्यास हे सर्व घटक प्रभावित होणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे हा ठेका रद्द करावा.
-दीपाली डेरे, मच्छीमार, केतूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news