Solapur Accident : सोलापूर बाह्यवळण रस्त्यावर भीषण अपघात

कंटेनर-ट्रकचे दोन्ही चालक गंभीर जखमी
Solapur Accident : सोलापूर बाह्यवळण रस्त्यावर भीषण अपघात
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद बाह्यवळण रस्त्यावर डी मार्टसमोर बुधवारी (दि. २८) दुपारी कंटेनर आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी डी मार्टसमोरील बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या चालकांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दोन्ही चालकांना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ विस्कळीत झाली. दुर्घटनाग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news