Solapur Crime News : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला

सोलापूरमधील घटना, एका आरोपीला अटक, पोलिस तपास सुरू
Solapur Crime News
File Photo
Published on
Updated on

Solapur Crime News : महाराष्ट्रात उद्योजकांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देणारे उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर अक्कलकोट येथे प्राणघातक हल्ला झाला. या घटनेची फिर्याद सूर्यवंशी यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस कॉन्स्टेबल वामन पिसे यांनी अक्कलकोट पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्‍यान यापूर्वीही राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

कारचा पाठलाग करुन हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

फिर्यादीमध्‍ये दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी (दि. २८ )उद्योजक राणा सूर्यवंशी हे अक्कलकोटचे दर्शन करून आपल्या गाडीने सोलापूरकडे येत होते. त्याचवेळी बोलेरो जीपमधून आलेल्या हल्लेखोरांनी राणा यांच्‍या कारचा पाठलाग केला. हल्लेखोरांनी त्‍यांची कार अडवत उद्योगपती राणा सूर्यवंशी यांना रिव्हॉल्वर आणि तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सचिन लालू राठोड (रा. मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण (रा. वडजी कॅनल तांडा), कृष्णा फुलचंद पवार (रा. वडजी कॅनल तांडा) आणि अविनाश शिवाजी राठोड (रा. बक्षी हिप्परगा तांडा) या चार आरोपींचा सहभाग होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन लालू राठोड याला ताब्यात घेतले. अन्य तिघे संशयित पसार झाले. उर्वरित तिघांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

Solapur Crime News
साेलापूर : टेंभुर्णीत चोरट्यांकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

हल्‍ल्‍यामागील कारणांचा तपास सुरु

"या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे आणि काही नवे पैलू समोर येतात का, याचाही तपास सुरू असल्‍याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news