सोलापूर : शहरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Solapur Crime : शहर गुन्हे शाखेची कामगिरी
Solapur Crime News
शहरात घरफोडी करणारी टोळी जेरबंद
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या चौघांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१८) मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून घरफोडीचे एकूण पाच गुन्हे उघड करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा ३ लाख ९० हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सिद्धू शामराव काळे (वय ३९, रा. मु. पो. चिंचोली एमआयडीसी, ता. मोहोळ), बजरंग नागनाथ चव्हाण (वय २९, रा. सनमडीकर हॉस्पिटल जवळ, जत, जि.सांगली), नरसिंह नागप्पा बल्लारी (वय ३१, रा. जत, जि.सांगली) व सचिन दामोदर सावंत (वय ३५, रा. जत जि. सांगली, सध्या सांगोला, जिल्हा सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरातील पोशम्मा मंदिर, धनलक्ष्मी नगर, जुना विडी घरकुलसह सोलापूर येथील आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी सूचना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला. यादरम्यान शहरात घरफोडी शहरातील एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिासांनी सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील अनेक भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, राजकुमार पवार, विनोद रजपूत, इम्रान शेख, उमेश पवार, सतीश काटे, बाळासाहेब काळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news