Solapur News : पेपर लिहिला अन्‌‍ ती गेली वडिलांच्या अंत्यविधीला

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम ः शिक्षणाधिकारी जगताप, मुख्याध्यापक माने यांनी केली मदत
Solapur News : पेपर लिहिला अन्‌‍ ती गेली वडिलांच्या अंत्यविधीला
Published on
Updated on

सोलापूर ः दहावी परीक्षेचा पहिलाच पेपर आणि अचानक सकाळी अल्पशा आजाराने वडील वारले. धनश्रीसमोर पवार हिच्यासमोर दहावी परीक्षा बुडणार हे निश्चित होते; पण धनश्रीच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक अस्वस्थ होते. धनश्रीला तिच्या कुटुंबानेही धीर देत परीक्षा दे, वडिलांचे अंत्यसंस्कार दोन तास पुढे ढकलू असे सांत्वन केले. त्यामुळे घरात वडिलांचा मृतदेह असतानाही धनश्री दहावीचा पेपर लिहून वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहिली. तिला माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शरदचंद्र पवार प्रशालेच्या मुख्याध्यापक तानाजी माने यांनी मदत केली.

शरदचंद्र पवार प्रशालेतील धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी दहावीत होती. शुक्रवारी (दि.20) दहावीचा मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिच्या वडीलांचे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यविधीसाठी नातेवाईक, शेजारी जमा होत होते. धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक अस्वस्थ झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन आई, भावाला, नातेवाईक यांना समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे ढकलण्याची विनंती केली. धनश्रीला धीर दिला आणि तिला स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसविले. तरीही पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्रप्रमुख गीता सादुल यांना तिला अर्ध्यातून सोडण्याविषयी सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी धनश्रीला धीर देत अत्यंविधीला पाठविले. धनश्रीच्या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालकांचे डोळे पाणावल्याचे चित्र पहायला मिळाले.

दीड तास लिहिला मराठीचा पेपर

वडिलांचे निधन झाल्यानंतर धनश्री पवारने मराठीच्या पेपरला जाण्यास नकार दिला होता. मात्र, मुख्याध्यापक माने यांच्या पुढाकारामुळे तिने दहावीचा पहिला पेपर देण्यास होकार दिला. मराठीचा पहिला पेपर दीड तास लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर बसून अंत्यविधीला पाठविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news