

सोलापूर : भाजपने राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी 74 जणांची जिल्हा प्रभारी पदाची निवड केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यासाठी विधान परिषदेचे आ. योगेश टिळेकर, आ. गोपीचंद पडळकर आणि माजी आ. संजय जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर शहर मतदारसंघासाठी आ. टिळेकर, सोलापूर पूर्व विभागासाठी आ. पडळकर, तर पश्चिम (माढा) भागासाठी माजी आ. जगताप यांनी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांत आता टिळेकर, पडळकर आणि जगताप हे पक्ष अधिक मजबुतीसाठी प्रयत्न करतील.
निवडी जाहीर करताना प्राधान्याने सोलापूर आणि माढा अशा लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष दिल्याचे दिसते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रभारी म्हणून आमदार, माजी आमदारांची निवड केली आहे. लोकसभेची निवडणूक लागण्यास आता बराच कालावधी असतानाही त्याची तयारी आतापासूनच भाजपने सुरू केल्याचे या निवडीवरून स्पष्ट होत आहे.