Solapur Fraud: भाड्याच्या गाडीची विक्री करून ५.५ लाखांची फसवणूक

जुनी चारचाकी गाडी खरेदीच्या बहाण्याने बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील एकाला ५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

बार्शी : जुनी चारचाकी गाडी खरेदीच्या बहाण्याने बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील एकाला ५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निशीकांत बलभीम सुतार (वय ४४) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी सुतार यांना जुनी चारचाकी गाडी घ्यायची होती. त्यांचे मित्र कृष्णा हराळे यांनी पुणे येथील सुमीत सुनील कवडे (रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क, पुणे) याच्याकडून गाडी घेतल्याचे सांगितले. कृष्णा यांनी सुमीतचे मोबाईल क्रमांक दिले. सुमीतने व्हॉट्सॲपवरून गाडी चे फोटो व कागदपत्रे पाठवली. ही गाडी ७ लाख २५ हजार रुपयांना ठरली.

दि. १४ ऑक्टोबर २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान सुतार यांनी गुगल पे वरून १ लाख ७५ हजार व रोख ७५ हजार असे एकूण २ लाख २५ हजार रुपये दिले. शिवाय २ लाख ७५ हजारांचा चेकही दिला. दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणी काळभोर येथे सुमीतने गाडीचा ताबा दिला. यावेळी लक्ष्मण कानडे व राजेंद्र जाधव साक्षीदार होते.

मात्र, गाडी नावावर करून देण्यास सुमीत टाळाटाळ करू लागला. संशय आल्याने सुतार यांनी मूळ मालक मिलींद ढावारे यांना संपर्क केला. ढावारे यांनी सांगितले की, गाडी सुमीतला विकलेली नसून भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यानंतर दि. १५ जानेवारी रोजी मूळ मालकाच्या नातेवाईकांनी गाडी परत नेली.फिर्यादीने पैसे परत मागितले असता सुमीतने मोबाईल ब्लॉक केला व तक्रार केली तर प्रकरण जड जाईल अशी धमकी दिली. सुमीत कवडे याने फसवणूक करून ५ लाख ५० हजार रुपये हडप केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news