Crop loan: पीक कर्ज वाटप न करणे जिल्ह्यातील बँकांना भोवले

ॲक्सिस, इंडियन ओव्हरसीज, बंधन, करूर वैश्य बँकांना नोटीस, जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे जिल्हा अग्रणी बँकेला आदेश
Crop loan: पीक कर्ज वाटप न करणे जिल्ह्यातील बँकांना भोवले
Published on
Updated on

सोलापूर : जिल्हास्तरीय बँकर्स बैठकीत काही बँकांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करून ठरवून दिलेले पीक कर्ज पूर्ण न करणे किंवा शासकीय योजना राबविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी नोटीस काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कर्जवितरणाची प्रगती, खाते उघडणीचे कामकाज आणि समितीने बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी याविषयी यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखार्डे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उमेशचंद्र दंडगव्हाळ, ओबीसी वित्तविकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व बँकांनी नेमून दिलेले टार्गेट शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक आहे. उद्दिष्टपूर्ती वेळेत साध्य करण्यासाठी प्रभावी नियोजन करा. प्रत्येक बँकेने 75 टक्के खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.
- एस. कार्तिकेएन, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news