Solapur Molestation Case: बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; टेंभूर्णीतील डॉक्टरवर गुन्हा

टेंभुर्णी शहरात एका डॉक्टरने पुणे येथील बँकेच्या महिला कर्मचाऱ्यास शरीर सुखाची मागणी करून लज्जास्पद वर्तन करीत तिचा विनयभंग केला
Molestation Case
Molestation CasePudhari
Published on
Updated on

टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात एका डॉक्टरने पुणे येथील बँकेच्या महिला कर्मचाऱ्यास शरीर सुखाची मागणी करून लज्जास्पद वर्तन करीत तिचा विनयभंग केल्याची घटना 16 एप्रिल रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात डॉक्टर च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रविणकुमार गौतम अनपट (रा.टेंभुर्णी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. या घटनेतील फिर्यादी तरुणी ही पुणे येथे बँकेत काम करीत असून पुणे येथील बँकेकडून टेंभुर्णी येथील डॉक्टरने कर्ज घेतलेे होते.या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने या पीडित तरुणीची नेमणूक केली होती.

16 एप्रिल रोजी पीडित तरुणी टेंभुर्णी शहरातील बेंबळे रोड येथील जयश्री मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड आयसीयु ॲक्सिडेन्टल केअर सेंटर येथे डॉ.प्रविणकुमार अनपट यांच्याकडे बँकेच्या लोनच्या वसुली करीता गेली होती.त्यावेळी अनपट याने बँकेच्या तरुणीस ‌‘तु लांबुन आली आहेस,तु जेवली नाहीस,आपण दोघे जेवण करु व माझे हॉस्पिटलच्यावर असलेल्या खोलीत आपण दोघे निवांत झोपु‌’ असे म्हणुन त्यांनी पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली. अशी फिर्याद तरुणीने दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news