Sachin Kalyanshetti Murder Plot: आ.कल्‍याणशेट्टींच्या खुनाच्या सुपारीचा प्रयत्न; श्रीशैल हुळ्ळे गजाआड

कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर कारवाई
Shrishail Hulle
Shrishail Hulle
Published on
Updated on

सोलापूर : अक्कलकोटचे आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्‍यांचा चालक आनंद सुरवसे याला पैशाचे आमीष दाखवल्याप्रकरणी प्रमुख संशयीत श्रीशैल हुळ्ळे याला सदर बझार पोलिसांनी कोल्‍हापुरातील किणी टोलनाक्‍यावरुन गुरुवारी (दि.१३) पहाटे अटक केली. त्‍याला न्‍यायालयात उभे केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.

आ. कल्‍याणशेट्टी यांना गोळी घालून ठार मारण्यासाठी पैशाचे आमीष त्‍यांच्‍याच चालकाला दाखविल्या प्रकरणी श्रीशैल हुळ्ळे (रा. वडदेगाव, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. मणिधारी हेरिटेज, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) आणि प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. मल्‍लिकार्जुन नगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) या दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्‍हा दाखल आहे. यातील प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी अटक केली असून तो न्‍यायालयीन कोठडीत आहे.

गुन्‍हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयीत आरोपी श्रीशैल हुळ्ळे हा फरार होता. त्‍याच्‍या शोधासाठी सदर बझार तसेच गुन्‍हे शाखेचे पथक रवाना झाले होते. गोपनिय माहितीच्‍या आधारे सदर बझार पोलिसांनी त्‍याचा पाठलाग करुन कोल्‍हापूरातील किणी टोलनाक्‍याजवळ पकडले. त्‍याला न्‍यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदरची कामगिरी पोलिस आयुक्‍त एम.राजकुमार, उपायुक्‍त प्रितम यावलकर, सहाय्यक आयुक्‍त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल सावंत, राजेश चव्‍हाण, संतोष पापडे, प्रमोद पकाले, सागर गुंड यांच्यासह इतरांनी पार पाडली.

श्रीशैलचे लोकेशन सापडत नव्हते

संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे हा गुन्हा केल्यापासून फरार होता. मात्र तो आपल्याशी संबंधितांच्या संपर्कात फक्त व्हॉटस्‌ ॲप कॉलच्या माध्यमातूनच राहात असे. त्यामुळे त्याचा ठावाठिकाणा लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी गोपनीय युक्तींच्या माध्यमातून संशयित श्रीशैलचा शोध घेतलाच.

तीन दिवस-रात्र पोलिस झोपलेच नाहीत

संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे याला पकडण्यासाठी सदर बझार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस मोठ्याप्रमाणावर प्रयत्न करत होते. त्यासाठी या दोन्ही पथकाचे पोलिस तब्बल तीन दिवस रात्र अजिबात विश्रांती घेतले नाहीत की झोपले नसल्याची माहिती उपायुक्त प्रितम यावलकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news