Solapur Sugarcane Fire : आष्टे येथे १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

तेरा शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला
Solapur Sugarcane Fire : आष्टे येथे १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
Published on: 
Updated on: 

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागून अंदाजे १५ ते १६ एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत तब्बल १३ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कष्टाने जोपासलेले पीक काढणीच्या तोंडावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.

आष्टे परिसरातील शेतांमध्ये ऊसाची लागवड केली होती. मंगळवारी सकाळी अचानक उसाच्या शेतातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसल्याने शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र वाऱ्यामुळे आग वेगाने पसरल्याने मोठ्या क्षेत्रावरील ऊस जळाला. शेतातून गेलेल्या वीजवाहिनीमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने पंचनाम्याच्या अहवालाची तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाईसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी रमेश नरुटे यांनी व्यक्त केली.

ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ तेथे जाऊन अग्निशमक दलाच्या गाड्या बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. १३ शेतकऱ्यांचा अंदाजे १५ एकर ऊस जळाला आहे. त्याबाबतचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.
- दीक्षा सातपुते, तलाठी, आष्टे
logo
Pudhari News
pudhari.news