Solapur news: आंबेडकर जयंती मिरवणुकीत 150 मंडळे सहभागी होणार

राज्यभरातून लाखो भीमसैनिक आज लावणार हजेरी
Solapur news: आंबेडकर जयंती मिरवणुकीत 150 मंडळे सहभागी होणार
Published on
Updated on

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची आज रविवारी (दि. 19) मिरवणुकीने सांगता होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरील विविध देखावे या मिरवणुकीत पहायला मिळणार आहेत. यावेळी साधारण 150 मंडळे सहभागी होणार असून, मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीची सोलापूरची मिरवणूक राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. यंदाही जयंतीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. आज रविवारी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ. आंबेडकर उद्यानापर्यंत मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक गाड्या लागल्या आहेत. डीजे बंदी असल्याने साऊंड सिस्टिम आणि बाबासाहेबांच्या जीवनावरील देखावे हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असणार आहे. साधारण 150 मंडळे या मिरवणुकीत सहभागी होतील. त्यासाठी रविवारी दिवसभर मिरवणूक मार्गावरील सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. मिरवणुकीसाठी राज्यासह तेलंगणा, कर्नाटक येथून भीमसैनिक सोलापुरात येतात. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news