

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात धोत्री येथील गोकूळ कारखान्यांकडील सन २०२५-२६ मधील थकीत ऊस बिल मिळाल्यानंतर शेतकरी आता सन २०२३-२४ आणि २०२४-२५ वर्षातील थकीत बिलासाठी आंदोलन करणार आहे. त्याआधी येत्या सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गोकूळ साखर कारखान्याला ऊस घातला आहे. मात्र, त्या शेतकऱ्यांची बिले अद्यापही कारखानदारांनी दिली नाहीत. त्यातच कारखाना ओंकार ग्रुपला विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, बिले देण्याची मागणी करत आहेत.
धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अठरा दिवस आंदोलन केल्यानंतर त्यांना सन २०२५-२६ या वर्षातील थकीत बिले मिळाली आहेत. मात्र, सन २०२३-२४ आणि २०२४-२०२५ मधील बिले अद्यापही शेतकऱ्यांना मिळालीनसल्यानेेपुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.