

सोलापूर : केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाने सोलापूरहून मुंबई, बंगळूरसाठी 20 सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग सुरु होतील, अशी घोषणा करुनही शनिवार सायंकाळपर्यंत तिकीट बुकिंग शेड्यूल आले नाही.
15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूर या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग 20 सप्टेंबरपासून होणार असल्याची माहिती केंद्रीय विमान नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केली होती. यानुसार अनेक प्रवाशांनी स्टार एअरलाईनच्या संकतेस्थळावरुन जाऊन याबाबतची माहिती घेतली. काहींनी स्टार एअर लाईनच्या कस्टमर केअरशी संवाद साधला. मात्र त्यांच्याकडून अजून शेड्यूल अपडेट झाले नसल्याचे सांगण्यात आले.
गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबई, बंगळूर साठी विमान सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा सोलापूरकरांना प्रथमपासूनच आहे. याशिवाय तिरूपतीला जाणार्या भक्तांकडूनही विमानसेवेची मागणी होत आहे.