Solapur news: शिवीगाळ केल्याने कृषी अधिकारी देवकर निलंबित

दक्षिण सोलापूर तालुका कषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी अमोल नामदेव देवकर यांनी शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले
suspended
suspended Pudhari News Network
Published on
Updated on

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका कषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी अमोल नामदेव देवकर यांनी शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. तशी तक्रार दाखल करण्यात आली होती.

कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांना दूरध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेबाबत कासेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच मौजे गावातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह दि. २९ मे २०२६ रोजी कृषि विभागाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली होती.

सदर तक्रारीची कृषि विभागाने तात्काळ दखल घेतली असून, विभागीय कृषि सहसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयामार्फत प्राथमिक तपासणीअंती सहाय्यक कृषि अधिकारी देवकर यांना दि. २९ मे २०२६ रोजी तत्काळ निलंबित करण्यात आले. याप्रकरणी पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news