सोलापूर : बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.अमित आळंगे यांची निवड

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.अमित आळंगे यांची निवड
बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.अमित आळंगे यांची निवड
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी विधी सेवा पॅनलचे प्रमुख अ‍ॅड. अमित आळंगे निवडून आले आहेत. आळंगे यांच्या रुपाने तरुण चेहर्‍याला संधी मिळाली आहे. सचिवपदी विधी व्यासपीठ पॅनलचे मनोज पामुल विजयी झाले आहेत.

बार असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 1597 सदस्यांनी मतदान केले होते. शुक्रवारी रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. विधी सेवा पॅनलचे तीन तर विधी व्यासपीठ पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : अमित आळंगे 851 , राजेंद्र फताटे 152, एस.व्ही. उजळंबे 581
उपाध्यक्ष : विजय शिंदे 671, जयप्रकाश भंडारे 545, परवेज ढालायत 264, मल्लिनाथ मम्हाणे 95
सचिव : मनोज पामुल 754, लक्ष्मण पाटील 525, शामराव बिराजदार 301
सहसचिव : निदा सैफन 677, मिरा प्रसाद 650, सुवर्णा शिंदे 178, मेघना मलपेद्दी 89
खजिनदार : विनयकुमार कटारे 643, प्रकाश अभंगे 252, संतोष बाराचारे 229, मयप्पा गौडावनरू 43, अब्दुल शेख 421
अध्यक्ष : अमित आळंगे
उपाध्यक्ष : विजय शिंदे
सचिव : मनोज पामुल
सहसचिव : निदा सैफन
खजिनदार : विनयकुमार कटारे

महिला वकिलातील सामना आटीतटीचा व रंगतदार होता. प्रत्येक टप्यावर हरकती घेतल्याने मतमोजणीस विलंब लागला. एकूण मतदार 1831 होते. 87.17%.मतदानाची नोंद झाली होती. सोमवारी 6 मेला अधिकृत निकालाची घोषणा होईल. दुपारी दोन वाजता विशेष सभेतून नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार सूपुर्त केला जाणार आहे.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश गायकवाड, विशेष निवडणूक अधिकारी व्ही.सी. दरगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश काळे, अनिता रणशृंगारे, करण भोसले, सुनिल क्षीरसागर, अविनाश बिराजदार, संदिप शेंडगे, दादा जाधव, अजय रणशृंगारे, शिवाजी कांबळे, मोहन कुरापाटी, योगीराज कलबुर्मे, प्रथमेश शिंदे, युवराज अवताडे, विकास कुलकर्णी, भिमाशंकर कत्ते यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news