Prakash Abitkar | बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत कारवाई : मंत्री प्रकाश आबिटकर

आषाढी वारीत रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स व तसेच वारकऱ्यांना न वाटलेल्या चष्माप्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही
Prakash Abitkar
Prakash AbitkarPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार आहे. आषाढी वारीत रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स व तसेच वारकऱ्यांना न वाटलेल्या चष्माप्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य विभाग आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सोलापुरात वैद्यकीय सेवेबाबत बैठक घेतली. ते म्हणाले, सुविधांचा डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुरेपूर वापर करावा. सर्वांनी समन्वयाने काम करावे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी आ. उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सेवा संचालक डॉ. कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, डॉ. हर्षल जाधव, अभिराज सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा शलचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.