Solapur: बुलेटच्या 37 कर्कश सायलेन्सरवर रोलर

टेंभुर्णीत 831 केसेस करून 7 लाख 50 हजाराचा दंड वसूल
Solapur: बुलेटच्या 37 कर्कश सायलेन्सरवर रोलर
Published on
Updated on

टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात बुलेट दुचाकीला कर्णकर्कश सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या 37 सायलेन्सरवर रोलर फिरविण्यात आला. एकूण 831 केसेसमध्ये 7.50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी शहरात बुलेटला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर लावून शहरातून मोठा व कर्णकर्कश्‌‍ व फटाके सारखा आवाज काढत रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांनी तत्काळ दखल घेत धाडसी कारवाई केली. आत्राम यांनी पोलिस अंमलदारांना घेऊन अकलूज चौक, करमाळा चौक, कुर्डूवाडी चौक व शहरातील रोडवर पेट्रोलिंग व नाकाबंदी करून बुलेटसारखी वाहने तपासली. बदललेले सायलेन्सर फिटरमार्फत काढुन पोलिस ठाण्यात लावून ते सर्व रोलरखाली फोडून टाकले. या पद्धतीने कारवाई करीत 37 बुलेटवर दंडात्मक कारवाई करून 18 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल करण्यातआला.

याचप्रमाणे काळे फिल्मिंग केलेली चारचाकी वाहने तपासण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये थार या गाड्या मिळून आल्याने त्यांच्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. इतर केसेसमध्ये रहदारीस अडथळा 43, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे 7, लायसन जवळ न बाळगणे 81, फॅन्सी नंबर प्लेट पाच, रिफ्लेक्टर नसणे 52, ओपन फाळका टेम्पो व इतर वाहने 17, विना सीट बेल्ट 175, बिगर नंबर प्लेट 19, फिल्मींग काळी काच 9, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे 32, विना लायसन्स आठ, ट्रिपल सीट 78, विना हेल्मेट 81, पोलिस इशारा देऊनही दुर्लक्ष करणे व इतर 193 अशा एकूण 831 केसेस करून एकूण सात लाख 50 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई पो. अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पो. अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा.पो.अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. अधीक्षक राहुल आत्राम, तसेच त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार हनुमंत झिंजे, सपोफौ संजय पांडेकर, पोहेकॉ मकबुल तांबोळी, पोहेकॉ विशाल शिंदे, पोकॉ रशीद मुलाणी, पोकॉ रहमान मुलाणी, पोकॉ सोमनाथ गायकवाड, पोकॉ सतीश कापरे, पोकॉ ज्ञानदेव सरडे, पोकॉ संदीप साखरे, पोकॉ दत्तात्रय वाघमारे, पोकॉ प्रसाद अनभुले, होमगार्ड ब्रह्मदेव मुंडे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news