

मोडनिंब: सोलापूर पुणे महामार्गावर सापटने गावाजवळ दोन कारची धडक एक तरुण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाला. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर सापटने गावाजवळ पुण्यावरून गुलबर्गा येथे भरधाव वेगाने जातहोती.
यावेळी कार क्रमांक KA 51 P 4672 ने अचानक रस्ता ओलांडणाऱ्या एका कार क्रमांक MH 14 DG 8886 ला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात एक कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये गेली. कारचालकाच्या बाजूला बसलेल्या एका तरुणाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली.
तर अन्य पाच जण मुकामार लागून किरकोळ जखमी झाले असून सदर अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ.महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केले. असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील ग्रस्तीपथक आणि टेंभुर्णी पोलिस स्टेशन येथील कर्मचारी, मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री. किरण अवताडे (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या अपघातातील वाहने वरवेड टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर दुसरी कार ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये गेलेली कार बाजूला काढली असून या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे १) श्रीशैल लक्ष्मीपुत्र जेवर्गी वय १८ वर्षे २) मनतम्मा दौलत बाबेत वय २० वर्षे ३) भाग्यश्री शरणू जेवर्गी वय २२ वर्षे ४) शरणू मल्लिकार्जून जेवर्गी वय ३० वर्षे ५) शिवलिंग मल्लना जेवर्गी वय २० वर्षे ६) शांतप्पा लक्ष्मीपुत्र जेवर्गी वय २३ वर्षे सर्वजण रा. चिलीगेरी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा , कर्नाटक येथील रहिवासी आहेत.