Solapur accident: पुणे–सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अपघात; ६५ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला
Solapur accident: पुणे–सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अपघात; ६५ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

मोडनिंब : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेटफळ गावाजवळ सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Solapur accident: पुणे–सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अपघात; ६५ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
Solapur Accident: बार्शी-सोलापूर महामार्गावर टेम्पो-टमटम यांचा अपघात

मृत व्यक्तीचे नाव पंडित नारायण सुर्वे (वय ६५, रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) असे आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुर्वे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके, सहायक नवनाथ मोरे तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी श्री. उमेश पवार (PSI) व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Solapur accident: पुणे–सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अपघात; ६५ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
Solapur Accident : सोलापूर-पुणे रोडवर दुचाकीचा भीषण अपघात

अपघातात मृत्यू झालेल्या पंडित नारायण सुर्वे यांचा मृतदेह वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. गोरखनाथ लोंढे व रुग्णवाहिका चालक मगंध भोसले यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या अपघाताची माहिती वरवडे टोल नाका येथील गस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी श्री. क्षीरसागर यांना दिली आहे. या घटनेमुळे अरण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news