बार्शी : भरधाव वेगातील दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बार्शी ते परांडा मार्गावर बार्शी शहरात घडली.
संजय मारुती अनभुले (वय 55) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. प्रथमेश लव्हु पवार (वय 19, रा. कृष्णा चाळ इंद्रानगर पारशीक खारेगांव कळवा ईस्ट ठाणे) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. विजय मारुती अनभुले(रा. नाईकवाडी प्लॉट बार्शी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संजय अनभुले हे सकाळी नियमित फिरण्यासाठी जात होते. दि.6 नोव्हेंबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे अनभुले यांच्यासह अन्य दोघे परांडा रोडने फिरण्यास गेले होते. बाह्यवळण रोड परांडा रोड येथुन परत माघारी येत असताना मागुन आलेल्या मोटारसायकलने अनभुले यांना जोरात धडक दिली. जगदाळे मामा हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचेे सांगितले.

