

बार्शी : धसपिंपळगाव रोडवर जिजाऊ नगर समोर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघात विष्णु महादेव उमाप (वय ४०, रा. भांडगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांचा मृत्यू झाला. ही घटना बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
विष्णु उमाप हे बार्शीच्या दिशेने जात असताना जिजाऊ नगर समोरील धसपिंपळगाव रोडवर त्यांना रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून विष्णु यांना मृत घोषित केले.
मयत अवस्थेत दाखल झाल्याची नोंद रुग्णालयातून करण्यात आली. मयत विष्णु उमाप हे भांडगावचे रहिवासी होते. अपघात नेमका कसा घडला, याचा शोध पोलिस घेत आहेत. हवालदार संदीप पाटील तपास करीत आहेत.