Solapur Accident: टेम्पोच्या धडकेत इंजिनिअरचा मृत्यू

सिद्धेश्वर साखर कारखाना रस्त्यावर शुक्रवारी (दि. २६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि टेम्पोमध्ये अपघात झाला
Solapur Accident: टेम्पोच्या धडकेत इंजिनिअरचा मृत्यू
Published on
Updated on

सोलापूर : शहरालगतच्या कुंभारी येथील सिद्धेश्वर साखर कारखाना रस्त्यावर शुक्रवारी (दि. २६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि टेम्पोमध्ये अपघात झाला. यात दुचाकीस्वार इंजिनिअर वरुण यशवंत खंडागळे (वय ३२) यांचा मृत्यू झाला.

वरुण खंडागळे हे दुचाकीवरून अक्कलकोटकडे निघाले होते. कुंभारी येथील सिद्धेश्वर कारखाना रोडवर भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हील पोलिस चौकीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news